अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहीलीच तरनी ही लाज
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहीलीच तरनी ही लाज
होss आगं झनानलं काळजामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी....
हंss बदलून गेलंया सारं
पिरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं
पिरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं
आलं मनातलं
ह्या व्हटामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
ह्या व्हटामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी....
हंss कवळ्यापनात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या भरलं
तुझं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सुर सनईचं राया सजलं
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या भरलं
तुझं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सुर सनईचं राया सजलं
हेss सजलं, ऊनवारं नभतारं सजलं
रंगलं मन हळदीनं रानी रंगलं
सरलं ह्ये जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं नजरनं इश जहरी भिनलं
रंगलं मन हळदीनं रानी रंगलं
सरलं ह्ये जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं नजरनं इश जहरी भिनलं
आगं धडाडलं
ह्या नभामंदी
आन् ढोलासंगं गात आलं जी
ह्या नभामंदी
आन् ढोलासंगं गात आलं जी
सैराट झालं जी ....
Comments
Post a Comment